अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाणमध्ये घडला होता प्रकार; चतुःशृंगी पोलिसांनी केला तपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाणमध्ये घडला होता प्रकार; चतुःशृंगी पोलिसांनी केला तपास
अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाणमध्ये घडला होता प्रकार; चतुःशृंगी पोलिसांनी केला तपास

अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाणमध्ये घडला होता प्रकार; चतुःशृंगी पोलिसांनी केला तपास

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या तरुणास न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा आदेश दिला. ही घटना सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाण येथे घडली होती.

आकाश नाथा कोळी (वय १९, रा. भेगडे चाळ, पाषाण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाषाण परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी दहावीमध्ये शिकत होती. आकाश मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. ८ सप्टेंबर २०१२ रोजी सायंकाळी साडेसात वाजता ती पाषाण येथील खासगी शिकवणीवरून पायी घरी येत होती. त्यावेळी आकाशने तिला अडवून तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने नकार दिला. तेव्हा त्याने तिला जवळच्याच मोकळ्या मैदानात ओढत नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून तिचे नाक, तोंड दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर कंपासपेटीतील कर्कटकने वार केले. त्यानंतर तो मुलीचा मोबाईल घेऊन पळून गेला.

दरम्यान, रात्री बराच उशीर झाला तरीही मुलगी घरी परत न आल्यामुळे तिच्या पालकांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पाषाण येथील डीएससी क्वार्टर्सच्या मोकळ्या मैदानात मुलीचा मृतदेह आढळून आला. चतुःशृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यानंतर त्यांनी वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्या आकाशला अटक केली. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये नोडल ऑफिसर दत्ता अंगरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला खूनप्रकरणी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड, बलात्कारप्रकरणी १० वर्षे कारावास, ५ हजार रुपये दंड व भारतीय दंड विधान कलम ४०४ नुसार तीन वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

असा घेतला आरोपीचा शोध
आकाश कोळी हा वडापावच्या गाडीवर काम करीत होता, त्यास ताडीचे व्यसन होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याने वर्तमानपत्रात मुलीचा फोटो आणि खुनाची बातमी वाचली, तेव्हा तो ‘माझ्याकडून मोठी चूक झाली’ असे बोलला व तेथून निघून गेला होता, असे पोलिस तपासात गाडाचालक व ताडीगुत्ता मालकाने सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top