अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

स्वामी विवेकानंदांना अभिवादन
पुणे ः स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सरदार विंचूरकर वाड्यातील स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला बुधवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य टिळकांचे १८९१ ते १९०५ या काळात विंचूरकर वाड्यात वास्तव्य होते. त्यावेळी १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद हेही आठ या दिवस या वाड्यात राहिले होते. या प्रसंगी लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टचे रवींद्र पठारे, नंदकुमार जाधव, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्षपदी हृषिकेश गोहर
पुणे ः अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची शहराची कार्यकारिणी जाहीर झाली असून शहराध्यक्षपदी हृषिकेश गोहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी राजेश चव्हाण, महासचिव चंदन भेंडवाल, सचिवपदी लोकेश चंडालिया, संघटक सचिवपदी आनंद गहलोत आणि वडगाव शेरी मतदार संघाच्या अध्यक्षपदी पुनीत कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुप बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर झाली.

मोक्षदा वर्मा-वाळके यांना पीएच.डी.
पुणे ः मोक्षदा वर्मा-वाळके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी या विषयात पीएच.डी. मिळाली आहे. ‘थायोसेमी कार्बन झोन डेरीव्हेटील्स ॲड मॉड्यूलटर्स ऑफ ए बीटा इंड्यूस्ट ऑक्सिडेटिव्ह स्टैस ॲड टॉक्सीसीटी इन अल्झायमर्स डिसीज हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. आघारकर रिसर्च इंस्टिट्यूटमधील डॉ. प्र. प. कुलकर्णी यांनी मोक्षदा यांना मार्गदर्शन केले.

नीलेश शहा प्रदेश सरचिटणीस
पुणे ः नीलेश अशोक शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते शहा यांना देण्यात आले. या वेळी सेलचे शहराध्यक्ष भोलासिंग अरोरा, नगरसेविका रत्नप्रभा जगताप तसेच गिरीशज सोळंकी, प्रमोद संचेती आदी उपस्थित होते.

स्वाती शिंदे सरचिटणीस
पुणे ः स्वाती शिंदे यांची प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. स्वामी समर्थ बचत गट, चैतन्य महिला ट्रस्टच्या त्या अध्यक्षा आहेत. शिंदे या पूर्वी शहर महिला काँग्रेसच्या सरचिणीस होत्या. शासकीय योजनांची महिलांना मदत मिळवून देण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षता समितीवर हनुमंत पाटोळे
पुणे ः पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी हनुमंत पाटोळे यांची नियुक्ती नुकतीच झाली. पाटोळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्याधिकाऱ्यांनी ही नियुक्ती केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top