मुदतीत अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या काही महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही.
Scholarship
ScholarshipSakal
Published on: 
Summary

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या काही महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही.

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) सध्या काही महाविद्यालये बंद (College Close) असून, ऑनलाइन अभ्यासक्रम (Online Study) सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी (Student) महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे (Scholarship) ऑनलाइन अर्ज सादर केलेले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे.

केंद्र सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संकेतस्थळावर नवीन अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २२ जानेवारीपर्यंत तर विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Scholarship
संरक्षण मंत्रालयात सिव्हिलियन्स भरती! 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी

पुणे विभागातील महाविद्यालयांमध्ये २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत. तसेच, महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित नूतनीकरणाचे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीतून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १७ जानेवारीपर्यंत तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी ३१ जानेवारीपर्यंत संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणच्या पुणे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्तीपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. तसेच, सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.

- बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com