Home
HomeSakal

पुणे : गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेत गोंधळ

पुणे महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यामध्ये अनेक गोंधळ असल्याचे समोर आले आहे.
Summary

पुणे महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यामध्ये अनेक गोंधळ असल्याचे समोर आले आहे.

पुणे - महापालिकेने (Pune Municipal) गुंठेवारी (Gunthewari) कायद्यांतर्गत घरे (Home) नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यामध्ये अनेक गोंधळ (Confusion) असल्याचे समोर आले आहे. ही घरे नियमित करताना मान्य १.१० एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) ग्राह्य धरून करण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. परंतु ‘युडीसीपीआर’मध्ये (UDPCR) (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली) गुंठेवारी अंतर्गत घरे नियमित करताना मान्य एफएसआयच्या (FSI) ७५ टक्केच (०.८२ टक्के) एफएसआय ग्राह्य धरून बांधकामे नियमित करावीत, असे म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहेत.

गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची मुदत राज्य सरकारकडून नुकतीच वाढविण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने देखील ही घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडून देण्यात आलेल्या जाहीर प्रकटनामध्ये ही घरे नियमित करताना मान्य (मूळ) एफएसआय १.१० नुसारच बांधकाम केले असेल, तरच ते नियमित करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. तर राज्य सरकारने २ डिसेंबर २०२० मध्ये संपूर्ण राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांसाठी युडीपीसआर नियमावली लागू केली आहे. या नियमावलीमध्ये (क्रमांक ३.४) गुंठेवारीची बांधकामे नियमित करताना मान्य (मूळ) एफएसआयच्या ७५ टक्केच एफएसआय ग्राह्य धरून ती बांधकामे नियमित करावीत, अशी म्हटले आहे. त्यामुळे महापालिका जाहीर प्रकटनामध्ये म्हटल्याप्रमाणे मान्य एफएसआय (१.१०) ग्राह्य धरून गुंठेवारीची बांधकामे नियमित करणार की ‘युडीपीसीआर’मधील तरतूद (७५ टक्केच) विचारात घेऊन बांधकाम नियमित करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Home
खडकी कॅन्टोमेंट हद्दीतील पाणीपुरवठा होणार बंद

नेमके काय झाले?

‘युडीपीसीआर’मधील तरतुदींचा विचार केला, मान्य एफएसआयाच्या ७५ टक्केच एफएआय विचारात घेऊन बांधकामे नियमित करता येणार आहे. म्हणजे अशी बांधकामे नियमित करताना १.१० नव्हे, तर त्याच्या ७५ टक्के म्हणजे ०.८२ टक्के एफएसआयपर्यंतचे बांधकाम मान्य होऊ शकणार आहे. महापालिकेचे जाहीर प्रकटन आणि ‘युडीपीसआर’मधील तरतूद या दोन्हीमध्ये विसंगती असल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.

टीडीआर वापरासही मर्यादा

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर गुंठेवारीचे घर असेल, तर त्यावर टीडीआर वापरता येणार नाही. तर नऊ मीटर रुंदीच्या वरील रस्त्यावर घरे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करावयाची असल्यास त्यासाठी देखील जागेच्या एकूण क्षेत्रफळाच्या चाळीस टक्के टीडीआर ग्राह्य धरून बांधकाम नियमित करता येणार नाही. कारण ‘युडीपीसीआर’मधील नोट्स‌ क्रमांक ११ मध्ये अशा घरांसाठी पन्नास टक्केच टीडीआर वापरण्यात परवानगी दिली आहे. जर शंभर टक्के टीडीआर (चाळीस टक्के) वापरायचा असेल, तर जमिनींच्या रेडी-रेकनरमधील जागेच्या किमतीच्या दहा टक्के शुल्क भरावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com