खडकी कॅन्टोमेंट हद्दीतील पाणीपुरवठा होणार बंद

थकीत बिल न भरल्यामुळे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारपासून (ता.12) खडकीतील नळांना सील करून खडकीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
Water Supply Close
Water Supply CloseSakal
Summary

थकीत बिल न भरल्यामुळे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारपासून (ता.12) खडकीतील नळांना सील करून खडकीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

खडकी - थकीत बिल (Arrears Bill) न भरल्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) पाणीपुरवठा (Water Supply) विभागाने बुधवारपासून (ता.12) खडकीतील नळांना सील करून खडकीचा पाणीपुरवठा बंद (Close) करण्याच्या कारवाईला (Crime) सुरुवात केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील सुरती मोहल्ला मधील नळ कोंडे काल बंद करण्यात आले, अचानक पाणी बंद केल्याने तेथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. खडकीतील अनेक नागरिकांनी व खडकी कॅन्टोमेंट बोर्डाने पाण्याचे बील न भरल्याने ही कारवाई सुरु करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. दरम्यान खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे 14 कोटी रुपयांचे थकीत बील असून हद्दीत 262 नळजोड आहेत. बील भरण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून वेळोवेळी नोटीस देण्यात आली होती मात्र अद्याप बोर्डाने पूर्ण रक्कम भरली नसल्याने ही कारवाई सुरु करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

दरम्यान, कॅन्टोमेंट च्या संबंधित अधिकऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. पाणीच बंद केल्याने आमची दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. आता कामावर कसे जायचे. खासदार, आमदार फक्त आश्वासन देतात, आजी माजी लोकप्रतिनिधीनी यात लक्ष दिले पाहिजे आणि आमची पाण्याची समस्या सोडवली पाहिजे अशी व्यथा सुरती मोहल्ला येथील राधिका सरोदे, सुमन देते, रफिक शेख, कलावती दिवे, संतोषी अग्रवालआदींनी सकाळ कडे मांडली.

Water Supply Close
पुणे पोलिसांच्या रडारवर असलेल्या नगरसेवक घोगरेंनी टाकला रजेचा अर्ज

महापालिकेला ही खर्च आहे. विभागाची बरीच कामे पैशाअभावी रखडली आहेत. खडकीतील खासगी व सरकारी दोन्हीची पाणीपट्टी थकीत आहे. लोकअदालत मध्ये देखील हा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावेळी आम्ही फक्त 35 नळजोड चे बिल भरणार असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र 262 नळजोड आहेत त्याचे बील कोण भरणार, त्यामुळे आम्हाला कनेक्शन तोडण्याशिवाय पर्याय नाही. सर्व खडकी कॅन्टोमेंट हद्दीतील कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.

- श्रीधर कामत, कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

आधीच कोरोनामुळे आमचे हाल होत आहेत आता पाणी पुरवठा बंद केल्याने आम्ही नागरिक हवालदिल झालो आहोत. खडकी कॅन्टोमेंट नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुल करते तर मग हा त्रास आम्ही का सहन करायचा. कॅन्टोमेंटला नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर खडकी महागापालिकेत विलीन करा.

- श्वेता जाधव, अध्यक्ष, आर पी आय ब्लॉक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com