नियोजित मातृत्व असल्यास अधिक सुरक्षित
नियोजित मातृत्व असल्यास अधिक सुरक्षितgoogle

नियोजित मातृत्व असल्यास अधिक सुरक्षित

स्त्री मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असले तरच गर्भधारणा करण्याचा तज्‍ज्ञांचा सल्ला

पुणे : मातृत्व हे नियोजितच असले पाहिजे. तरच ते जास्तीत जास्त सुरक्षित राहील. मातृत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्त्री सक्षम आहे, याची वैद्यकीय तज्ज्ञांनी खात्री केल्यानंतर गर्भधारणा करावी, असा सल्ला स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांनी दिला. मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी ११ एप्रिल हा दिवस सुरक्षित मातृत्व दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यावेळी त्यांना हा सल्ला दिला.

महिला आरोग्याचे विशेषतः गर्भवतींच्या संदर्भातील आरोग्य हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. कारण, जगाच्या तुलनेत १२ टक्के माता मृत्यू एकट्या भारतात होतात. दरवर्षी सुमारे ४५ हजार माता आपल्या बाळाला जन्म देताना हे जग सोडून जातात. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पण, ते प्रमाण पूर्ण कमी करण्यासाठी नियोजित मातृत्व हाच प्रभावी उपाय असल्याचा विश्वास स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केला.
“गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीतज्ज्ञांकडूनच तपासणी करणे आवश्यक असते. अँनेमिया आणि गर्भावस्थेत वाढणारा रक्तदाब यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपचार करावे लागतात. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच उपचार केला पाहिजे,” असेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रसूतीवर झालेला परिणाम...


- कोरोना उद्रेकात पॉझिटिव्ह असलेल्या आईमुळे बाळालाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रसूतीमधील गुंतागुंती वाढली होती. पण, त्यातून मातामृत्यूचे प्रमाण खूप वाढले नाही, असे निरीक्षण स्त्रिरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी नोंदविले.
- गर्भावस्थेत असला तरीही कोरोना प्रतिबंध लस घेतली पाहिजे
- लसीकरणामुळे प्रसूतीमधील गुंतागुंत निश्चित कमी होत आहे
- वैयक्तीक स्वच्छता, चौरस आहार कोरोनामध्ये महत्त्वाचा ठरतो.


काय केले पाहिजे


- वयाच्या आठराव्या-एकोणिसाव्या वर्षी लग्न होऊन लगेच त्याच वर्षी प्रसूती होण्याचे प्रमाण २१-२२ वर्षांपर्यंत पुढे ढकलले पाहिजे.
- वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे वेळेत सोनोग्राफी करा
- रक्तस्त्राव नियंत्रित करण्याची सुविधा आणि सिझेरियन करण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी प्रसूतीस प्राधान्य द्यावे

सुदृढ जीवनशैलीचे महत्त्व


- गर्भावस्थेत दोन जीवांचे पोषण होत असते, हे कधीही विसरू नका, असा सल्ला डॉ. पटवर्धन देतात. त्यामुळे प्रत्येक गर्भवतीने सुदृढ जीवनशैलीचे अनुकरण केले पाहिजे. त्यात सकस आहार, नियमित तपासण्या,

आहार कसा घ्याल


- घरी खाण्याची सवय कमी झाली आहे. चमचमीट खाण्याला प्राधान्य असते. चाट आणि चायनीजकड ओढा असतो. पण, जिथे स्वच्छता, पौष्टीकपणा, चांगले वातावरण अशा ठिकाणी आहार घ्या. असे वातावरण घरात असते.
- ताजे अन्न पदार्थ खा
- चौरस आहार हवा
- थोडे-थोडे अन्न थोड्या-थोड्या वेळाने असे आहाराचे सूत्र ठेवा
- दोन वेळच्या खाण्यामध्ये खूप वेळाचे अंतर ठेवू नका
- ताणतवाणाचे व्यवस्थापन करा

सुरक्षित मातृत्वासाठी नियोजित प्रसूती आवश्यक आहे. नियोजन न करता आलेल्या गर्भावस्थेत धोके असण्याची शक्यता असते. गर्भ ठेवण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानुसार हिमोग्लोबिन, रक्त गट, एचआयव्ही अशा काही मूलभूत चाचण्या करण्याची गरज आहे.
-डॉ. संजय तांबे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com