बनावट वेबसाइटच्या माध्यमातून सौर उर्जा योजनाचे आमिष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solar energy scheme
बनावट वेबसाइटच्या माध्यमातून सौर उर्जा योजनाचे आमिष

बनावट वेबसाइटच्या माध्यमातून सौर उर्जा योजनाचे आमिष

पुणे : बनावट वेबसाईटच्या (संकेतस्थळ) माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषीपंप मिळवून देण्याचे शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. वीजग्राहकांनी अशा प्रकारच्या बनावट संकेतस्थळाला प्रतिसाद देऊ नये. सौरकृषी पंप योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला वा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.(Solar energy scheme)

हेही वाचा: पुणे: स्लॅब दुर्घटनेतील कामगारांना अजित पवारांकडून श्रद्धांजली; पाच लाखांची मदत

शेतकऱ्यांना jalsanjivini.in या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार समोर आली आहे. असा प्रकार अहमदनगर येथील सायबर पोलिसांच्या तपासात समोर आला असून एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजनेची संपूर्ण माहिती वा लाभ घेण्यासाठी अधिकृत शासकीय संकेतस्थळावर वा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महावितरण नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: थेऊर यशवंत साखर कारखान्यात भ्रष्टाचाराची जंत्री

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..