Traffic Police
Traffic PoliceCanva

पुणे : वाहनचालकांनी चलन भरूनही दंडाचा ससेमिरा कायम

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांनी दंड भरल्यानंतरही त्यांच्या मागे असलेला दंडाचा ससेमिरा अद्याप कायम आहे.
Summary

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांनी दंड भरल्यानंतरही त्यांच्या मागे असलेला दंडाचा ससेमिरा अद्याप कायम आहे.

पुणे - वाहतूक नियमांचे (Transport Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांनी दंड (Fine) भरल्यानंतरही त्यांच्या मागे असलेला दंडाचा ससेमिरा अद्याप कायम आहे. दंड भरल्यानंतर ते पोलिसांच्या (Police) ई-चलन (E-Challan) सिस्टिममध्ये अपडेट न झाल्याने भरलेला दंडदेखील प्रलंबित दाखवत आहे. त्यामुळे पोलिसांनी (Police) पकडल्यास भरलेल्या दंडाची पुन्हा मागणी केली जात आहे.

दंड केल्यानंतर वाहनचालक तो भरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही सर्व प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवली होती. गेल्या दोन लोकअदालतीमध्ये सुमारे दोन लाख वाहनचालकांनी त्यांच्या वाहनावर प्रलंबित असलेला दंड न्यायालयात लोकअदालतीदरम्यान भरला. तडजोड शुल्क भरल्यानंतर त्याची पावती वाहनचालकांना देण्यात आली. मात्र, ऑनलाइन दंड भरल्यानंतर त्यांची डिजिटल नोंद झाली असली, तरी प्रत्यक्षात वाहनचालकांना पावती दिली नाही.

Traffic Police
पुणे जिल्ह्यात मंगळवारी १,९०६ नवे कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

त्यामुळे आपण दंड भरल्यानंतर तो पोलिसांच्या ई-चलन सिस्टमवर अपडेट होर्इल, असे समजत अनेकांनी तो ऑनलाइन कमी झाला की नाही, हे तपासलेच नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर किंवा दंड भरल्याच्या काही दिवसांनंतर तपासणी केल्यावर भरलेला दंडदेखील प्रलंबित असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आले आहे. दंड भरल्याचे मेसेजदेखील अनेक वाहनचालकांना आलेले नाहीत. त्यामुळे पैसे भरून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या लोकअदालतीत मी माझ्या वाहनावर असलेला पाच हजार ३०० पैकी एक १०० रुपयांचा दंड तडजोड करून भरला होता. गेल्या महिन्यात मला पोलिसांनी पकडले, तेव्हा कळाले की मी भरलेला दंड पोलिसांच्या ई-चलन सिस्टिममध्ये अपडेट झालेला नाही. त्यामुळे दंडाची पावती मिळण्यासाठी मी न्यायालयात पाच वेळा गेलो. तेव्हा पावती मिळाली. मात्र, माझ्या वाहनावरील दंड ई-चलन सिस्टिममध्ये अद्याप कमी झालेला नाही.

- दिलीप जोशी, सेवानिवृत्त नोकरदार

लोकअदालतीमध्ये अनेक प्रकरणांत तडजोड करून दंड घेतला आहे. तडजोड रक्कम भरल्यानंतर त्याची पावती संबंधित वाहनचालकांना दिली आहे. दंडाची रक्कम स्वीकारल्यानंतर ‘पेड ॲट कोर्ट’ असे अपडेट करून त्या दंडाची नोंद ऑनलाइन डिलीट करण्यात येते. काही वाहनचालकांना अगदी पाचपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमभंगाचा दंड केला आहे व त्यातील दोन किंवा तीन दंड त्यांनी लोकअदालतीत भरले आहे. भरलेल्या दंडाची नोंद डिलीट केली आहे की नाही, याची खात्री त्यांनी करावी. याबाबत काही तक्रार असेल, तर तिचे निरसन वाहतूक विभागातील तक्रार विभागात केले जार्इल.

- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com