Pune University
Pune UniversitySakal

विद्यापीठ कायदा बदलाचा विद्यार्थी परिषदेकडून निषेध

‘शिक्षणातील राजकीय हस्तक्षेपाचा जाहीर निषेध’, ‘विद्यापीठ बनणार राजकीय कट्टा’

पुणे, ता. २८ : राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात आले. ‘झोपलेले सरकार उठणार कधी?, विद्यार्थ्यांना न्याय मिळणार कधी?’, ‘शिक्षणातील राजकीय हस्तक्षेपाचा जाहीर निषेध’, ‘विद्यापीठ बनणार राजकीय कट्टा’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कायद्यात राज्य सरकारने केलेल्या बदलांचा निषेध केला.

Pune University
Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर यांच्यातर्फे सोमवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. ‘राज्य सरकारला जागे करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या संरक्षणासाठी’ हे आंदोलन करण्यात आल्याचे विद्यार्थी परिषदेतर्फे सांगण्यात आले. सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणली. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. तसेच शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न केला जाईल याचा निषेध आंदोलनाद्वारे केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, महानगर मंत्री शुभंकर बाचल आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com