PMP-Bus
PMP-BusSakal

पुणे : PMP प्रवासासाठी ‘परिसर’ चा पुढाकार

सार्वजनिक बससेवा तितकीच महत्त्वाची आहे.

पुणे: वेळेवर बस मिळते, एकदा विश्वास ठेवून तर पहा, ‘माझी सोय, माझी बस’ हे ब्रीद लक्षात ठेऊन नागरिकांनी पीएमपीच्या बसने प्रवास करावा, असे आवाहन ‘परिसर’ संस्थेने बुधवारी केले. शहरात मेट्रोचे जाळे आता पसरणार आहे. तरीही सार्वजनिक बससेवा तितकीच महत्त्वाची आहे. ती सामान्यांची जीवनवाहिनी आहे.

PMP-Bus
Pune Corporation: प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता

गाडगीळ म्हणाले, ‘‘पुण्यात ७० लाख प्रवाशांना पीएमपी सेवा देते. सध्या पीएमपीच्या १४०० बस रस्‍त्यावर धावतात. मात्र, प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी दर लाखामागे ५० बसची गरज असून शहराला किमान ३५०० बसेसची गरज आहे. प्रवाशांचे अनुभव त्यांच्या समस्या, मागण्या यांचा एकत्रित अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.’’
वेलणकर म्हणाले की, शाळा, महाविद्यालयीन जीवनात बसनेच प्रवास केला. बसला गर्दी असल्यामुळे लोकांची विविध रूपे प्रवासा दरम्यान पाहता आली. त्‍यांचे हाव भाव, वागणे बघून अभिनय शिकता आला. कोणतेही पात्र साकारताना हा अनुभव उपयोगाचा ठरतो. त्यामुळे इतरांसह विद्यार्थ्यांनी बसने प्रवास करावा.

PMP-Bus
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी पीएमपी बसने प्रवास करावा, अशी जनजागृती परिसर संस्थेतर्फे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून संस्थेने पुणे स्टेशन ते जंगली महाराज रस्ता या मार्गावर बस यात्रा काढण्यात आली होती. यावेळी संस्थेचे प्रमुख रणजित गाडगीळ, अभिनेता आरोह वेलणकर, वास्तुविशारद आणि वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य थिएटर ग्रुपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उद्यानाबाहेर पथनाट्य सादर केले. तसेच जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानाबाहेरील पदपथावर विविध माहिती संदेश देणाऱ्या पोस्टरचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रवाशांचे अनुभव, त्यांच्या समस्या यावेळी जाणून घेण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com