Pune Corporation: प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
लक्ष बदलांकडे!

Pune Corporation: प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर सुनावणी झाल्यानंतर आता त्यानुसार आवश्‍यक त्या ठिकाणी बदल करण्यासाठी ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम यांच्या समितीची खलबते सुरू आहेत. यामध्ये शिवाजीनगर, कोथरूड व हडपसरमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह


महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेवर साडेतीन हजार हरकती व सूचना आल्या. त्यावर २४ व २५ फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये बाणेर-सूस म्हाळुंगे हा प्रभाग क्रमांक १३ दोन सदस्यांचा करण्यात आला. ही रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप सुरवातीपासूनच होत असून, याचे पडसाद सुनावणीमध्ये देखील उमटले आहेत. तसेच हडपसर भागातील सय्यदनगर, रामटेकडी येथूनही मोठ्याप्रमाणात हरकती आल्या आहेत. सुनावणीमध्येही त्याचे पडसाद उमटले होते. सुनावणीनंतर निवडणूक आयोगाला बदलांच्या शिफारशींसह त्याचा अहवाल सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये सुमारे १५ ते २० महत्त्वाचे बदल करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: Pune City Corona: रुग्णांची संख्या पहिल्यांदा पन्नाशीच्या आत

असे आहे गणित
- निवडणुकीसाठी ५७ प्रभाग तीन सदस्यांचे
- प्रभाग क्रमांक १३ हा एकमेव दोन सदस्यांचा
- दोन सदस्यांचा प्रभाग एक तर पहिला किंवा शेवटचा प्रभाग दोनचा असावा असे अपेक्षित
- प्रभाग क्रमांक १३ हाच प्रभाग दोनचा कसा झाला असा प्रश्‍न
- या प्रभागाच्या रचनेत बदल होण्याची शक्यता
- हा बदल झाला तर बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, गोखलेनगर, एरंडवणे, कोथरूड भागातील प्रभागांच्या रचनेत बदल होण्याची शक्यता
- त्यामुळे आरक्षणांचेही गणित बदलणार

हेही वाचा: Pune City Corona: रुग्णांची संख्या पहिल्यांदा पन्नाशीच्या आत

कमालीची गुप्तता
रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून मोठ्याप्रमाणात हरकती आलेल्या आहेत. धायरी-आंबेगाव, शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी या या भागातही बदलांची शक्यता असल्याने त्या परिसरातील इतर प्रभागांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बदलांबाबत कमालीची गुप्तता ठेवली जात आहे. त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्या शिफारशी स्विकारायच्या की नाही हे आयोग ठरणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

निवडणूक आयोगाने शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत अहवाल सादर केला जाईल. प्रभाग रचनेतील बदलांबाबत भाष्य करणार नाही.
- एस. चोकलिंगम, ‘यशदा’चे महासंचालक तथा प्राधिकृत अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..