नॅक ॲक्रिडेशन विषयावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅक ॲक्रिडेशन विषयावर कार्यशाळा
नॅक ॲक्रिडेशन विषयावर कार्यशाळा

नॅक ॲक्रिडेशन विषयावर कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व महाविद्यालयांसाठी मॉडर्न लॉ कॉलेजतर्फे ‘रिव्हाईस्‌ गाइडलाइन्स फॉर नॅक ॲक्रिडेशन’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, ‘नॅक’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. देवेंदर कवडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. डॉ. कवडे म्हणाले, ‘‘गुणवत्तेसाठी काम करत रहा, शिक्षण संस्थेला चांगला दर्जा आपोआप मिळेल.’’ तर डॉ. एकबोटे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च उच्च शिक्षणावर व्हावा. उपलब्ध विविध अभ्यासक्रमांसाठी फी वेगवेगळ्या खासगी आणि सरकारी संस्थाकडून भरपूर प्रमाणात आकारली जाते. ही फी अनेक विद्यार्थ्यांना परवडणारी नसते, ही उच्च शिक्षणातील मोठी अडचण आहे.’’ कार्यशाळेत डॉ. खरात यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत सोसायटीच्या १० संस्थांमधील ३५० प्राध्यापक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top