मिसाळ वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांना समज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिसाळ वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांना समज
मिसाळ वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांना समज

मिसाळ वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांना समज

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महात्मा फुले मंडईतील मिसाळ वाहनतळावर योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जात नाही. तसेच नागरिकांसोबत अरेरावीची भाषा केली जात असल्याच्या तक्रारी आल्याने या कर्मचाऱ्यांना समज देऊन व्यवस्थित वागण्याची तंबी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या वाहनतळावर नागरिकांना कायम वाईट अनुभव येत असून, वारंवार तक्रारी करून देखील ठेकेदार प्रशासनाला जुमानत नाहीत. तसेच महापालिका स्वतः चालवत असलेल्या वाहनतळावरही कर्मचाऱ्यांकडून त्याच पद्धतीने वर्तणूक केली जात आहे. वेळेआधी वाहन तळ बंद करणे, जास्त पैसे घेणे, उद्धटपणे वर्तणूक करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. मिसाळ वाहनतळावर घडलेल्या प्रकाराबाबत आज वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वाहतूक नियोजन विभागाने तेथील कर्मचाऱ्यांना वर्तणूक न सुधारल्यास कारवाई केली जाईल, अशी समज दिली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘वाहनतळांवरील व्यवस्थापन सुधारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मिसाळ वाहनतळाच्या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल.

शुल्क तीन रुपयेच
मंडईतील बाबू गेणू वाहनतळावर प्रतितास दुचाकीसाठी तीन रुपये व चारचाकीसाठी १४ रुपये शुल्क आहे. तसे वाहनतळाच्या ठिकाणी फलक लावलेले आहेत. पण, तेथील कर्मचारी हे जुने दर आहेत, असे सांगून दुचाकीस्वाराकडून दहा रुपये व चारचाकी चालकाकडून २० रुपये प्रतितास पैसे घेत आहेत. प्रत्यक्षात महापालिकेने या ठेकेदारासोबत कोणताही नवा करार केलेला नाही व दरही वाढवले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या वाहनतळावर दुचाकीसाठी प्रतितास तीन व चारचाकी १४ रुपयेच द्यावेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top