घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्याची पावती ः पवार

घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्याची पावती ः पवार

पुणे, ता. २९ ः घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्यात पुण्यात उत्तम कार्य होत आहेच. पण, ‘जीएसएफ’ या गैरसरकारी (एनजीओ) संस्थेने त्याची दखल घेऊन तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देणे ही त्यांच्या कामाची पावती आहे, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी येथे व्यक्त केले.
ग्लोबलाईझ स्किल फाउंडेशन या संस्थेने आळे (ता. जुन्नर, प्रथम), ससेवाडी (ता. भोर, द्वितीय) व कान्हेवाडीतर्फे चाकण (ता. खेड, तृतीय) या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार दिला. पवार यांनी शाळेत शिकलेल्या कविता आजही कशा पाठ आहेत, याचे प्रात्यक्षिकच दाखविले. तिन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी, ‘खरा सत्कार आमच्या सफाई कर्मचाऱ्‍यांचा आहे, पुरस्कार घेणारे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत,’ असे सत्काराला उत्तर देताना सांगितले.
जीएसएफच्या सहसंस्थापिका प्रा. अबोली मिश्रा यांनी स्वागत केले. संस्थेचे कार्यक्रम संचालक व स्कूल ऑफ लॉचे अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. मकरंद माळवे यांनी सूत्रसंचालन केले तर कवी धनंजय तडवळकर यांनी आभार मानले. उल्हास पवार व माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांची ‘वाचन’ या विषयावर गझलकार प्रदीप निफाडकर यांनी मुलाखत घेतली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अजय मिश्रा, माजी आमदार मोहन जोशी, डॉ. संतोष दास्ताने, फर्ग्युसनचे माजी प्राचार्य वसंतराव वाघ, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संशोधन प्रमुख डॉ. विजय कुलकर्णी, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. बी. आर. लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाच्या निरीक्षकपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल संगीता साळुंके यांचाही सत्कार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com