जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

पुणे, ता. २९ : शिवीगाळ, कोयत्याने मारहाण करून २० वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तीन जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश राजेंद्र ठाकूर, विजय लासुरे (दोघेही रा. सुतारदरा, कोथरूड), विकी चंद्रकांत लोयरे (वय २०, रा. भूगाव) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणात रोहिदास उभे यास यापूर्वीच अटक करण्यात आली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मार्च रोजी साडेसातच्या सुमारास सुतारदरा परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपींना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com