पीएमपीचे चाक अंगावरून गेल्याने महिला जखमी
पीएमपीचे चाक अंगावरून गेल्याने महिला जखमीsakal

पीएमपीचे चाक अंगावरून गेल्याने महिला जखमी

लाल महालाजवळील घटना; प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती

पुणे : दुचाकीच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या पादचारी महिलेच्या अंगावरून पीएमपी बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शिवाजी रस्त्यावर लाल महालाजवळ घडली. अनिता पवार असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला लाल महालाजवळ पायी जात असताना एका दुचाकीचा धक्का लागून, तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी चिंचवडहून शनिवारवाडा, लाल महालमार्गे कात्रजला जाणाऱ्या पीएमपी बसचे मागील चाक महिलेच्या अंगावरून गेले. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. काही नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com