फसवणूकप्रकरणी पती-पत्नीचा जामीन फेटाळला

फसवणूकप्रकरणी पती-पत्नीचा जामीन फेटाळला

पुणे, ता. २० : बांधकाम व्यावसायिकाची सहा कोटी २४ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतीचा नियमित, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी फेटाळला. सचिन हनुमंत थोरात आणि पत्नी सुप्रिया (दोघेही, रा. आकुर्डी) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी जामिनास विरोध केला.

या बाबत ३७ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिघी पोलिसांत फिर्याद दिली आहे. २०१४ ते २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. डूहूळवाडी मोशी येथील बांधकाम प्रकल्पात बुकिंग केलेल्या फ्लॅटवर कमिशन देण्याच्या अटीवर पती-पत्नी काम करत होते. दोघांनी परवानगीशिवाय सदनिकाधारकांकडून रोख स्वरूपात २७ लाख ८० हजार स्वीकारले. तर, बनावट कागदपत्रांद्वारे फिर्यादीच्या कन्स्ट्रक्‍शनचे चिंचवड येथील एका बॅंकेत चालू खाते सुरू केले. त्यावर नऊ कोटी ५७ लाख ७६ हजार ३०० रुपये जमा केले. त्यापैकी तीन कोटी ६० लाख ६८ हजार ९७१ रुपये फिर्यादींच्या वेगवेगळ्या खात्यांत ट्रान्स्फर केले. उर्वरित पाच कोटी ९७ लाख सात हजार ३२९ रुपये रोखीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सचिन याला अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com