nitin gadkari
nitin gadkariSakal

Alandi News : आळंदीच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करा - नितीन गडकरी

शेगाव संस्थान, शिर्डी, आणि तिरुपती देवस्थानच्या मंदिर आणि परिसरात चांगली सुधारणा झाली आहे.

आळंदी : शेगाव संस्थान, शिर्डी, आणि तिरुपती देवस्थानच्या मंदिर आणि परिसरात चांगली सुधारणा झाली आहे. त्याचप्रमाणे आळंदीत मंदिराच्या आजूबाजूला विकास करण्याबाबत देवस्थानने विचार करून मास्टर प्लॅन तयार करावा. हा विकास करताना पुढील शंभर वर्षांचा विचार केला पाहिजे.

कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नको, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आळंदीत सांगितले. आळंदी देवस्थानच्या मालकीच्या गायरान जमिनीतील वारकरी केंद्रित बहुउद्देशीय ज्ञानभूमी या नियोजित प्रकल्पाचे भूमिपूजन व ध्वजपूजन शुक्रवारी (ता. १२) गडकरी यांच्या हस्ते झाले.

या वेळी शांतिब्रह्म मारोती महाराज कुरेकर, आमदार दिलीप मोहिते, महेश लांडगे,
प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.


गडकरी म्हणाले, ‘‘देवस्थानच्या ज्ञानभूमी प्रकल्पामध्ये वारकर्‍यांना केंद्रबिंदू मानून विकास केला जात आहे. यामध्ये संतांचा इतिहास, आध्यात्मिक आणि पालखी मार्ग या माहितीचे दर्शन भाविकांना इथे आल्यानंतर होणार आहे. तीर्थयात्रीची निवास व्यवस्था आहे.

मात्र विकास करताना संतांच्या शिकवणुकीप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या ओवीला अभिप्रेत वनस्पती जतन करून संवर्धन केले पाहिजे. भविष्यातील भारत निर्माण हे संतसांप्रदायाचे स्वप्न आहे. या प्रकल्पाचे नाव ज्ञानभूमी आहे. ज्ञान हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रूपाने दिले. पसायदानातील शब्द हीच खरी दौलत आहे. पसायदान आणि त्याचा प्रत्येक शब्द आपण आचरणात आणतो. ’’

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व वाढविले आहे. संतांच्या प्रेरणेतून ज्ञानाचा संबंध हा मूल्याधिष्ठित, धार्मिक, संस्कारी जीवन पद्धती घडविणारा आहे.

संतांचे ज्ञान व्यक्तीचे जीवन बदलणारे, सामाजिक क्षेत्राला प्रगल्भ करून आदर्श समाज घडविणारे आहे. समाज संस्कारी करण्याचे काम संतांनी केले. समाजासाठी जीवन समर्पित करून समाज घडविणारे अनेक वारकरी आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भूमिपूजनापूर्वी गडकरी यांनी ज्ञानेश्वर माउलींच्या संजिवन समाधीचे दर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com