Baramati Loksabha Constituency
Baramati Loksabha Constituency sakal

Baramati Loksabha Constituency : कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

बारामती मतदारसंघ : आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह औद्योगिक विस्ताराला मोठा वाव

बारामती : शहरी भागालगत असलेली मोठी मतदारसंख्या हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पुरंदर, खडकवासला, दौंडलगतचा भाग हा पुणे शहरालगत आहे. शहरालगतचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात असल्याने इंदापूर ते पुण्याची हद्द असा या लोकसभा मतदारसंघाचा विस्तार आहे.

१९५७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या संघात भोर तालुक्यातील सुंदर निसर्गसंपन्न परिसर, बारामती व इंदापूर तालुक्यातील समृद्ध वनजीवन, सुपे व बारामतीतील अभयारण्य, उसासह द्राक्ष, डाळिंब, फळबागांची शेती, हिंजवडी परिसरातील आयटी पार्क, खडकवासला, उजनी, भाटघर, नाझरे यासारखी धरणे, दौंडसारखे रेल्वेचे जंक्शन, पुरंदरचा निसर्गसुंदर किल्ला, मोरगाव सिद्धटेक अष्टविनायक व जेजुरीच्या खंडोबासारख्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

नद्यांवरील बंधारे, कालवे, विहिरी यामुळे काही भाग बागायती आहे, तर बारामती, इंदापूर, पुरंदरसारख्या तालुक्यात दरवर्षी टँकरचीही गरज भासते. जनाई शिरसाई, पुरंदरसारख्या उपसा योजना झाल्या असल्या, तरी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आजही काही भागांत लोकांना वणवण करावी लागते.

राज्यातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सेंटर बारामतीत साकारत असून, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाउंडेशन, आयबीएम व ऑक्सफर्डसारख्या नामवंत संस्थांकडून बारामतीत कामे सुरू आहेत. पहिला फार्म ऑफ द फ्युचर उपक्रम बारामतीत सुरू झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचे काम याच लोकसभा मतदारसंघातून भविष्यात होणार आहे.

गेल्या काही वर्षांत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला यासारख्या भागांत वेगाने बांधकाम व्यवसाय वाढल्याने पायाभूत सुविधांच्या निर्माणामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघातील खडकसवाला विधानसभा मतदारसंघातील कात्रज, सिंहगड रस्ता, वारजे यासारखा भाग पुणे शहरात येतो. झपाट्याने विकसित होत असलेल्या या भागातील नागरिक प्रश्‍नही वेगळे आहेत. परंतु या भागातून भविष्यात मतदारसंघात मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे.

दृष्टिक्षेपात मतदारसंघाची वैशिष्ट्ये...

  •    समृद्ध सहकारी साखर कारखानदारी व पूरक व्यवसाय

  •    द्राक्ष, डाळिंब, साखरनिर्मितीसाठी प्रसिद्ध भाग

  •    कऱ्हा, नीरासारख्या नद्या तसेच नीरा उजवा व डावा कालव्यामुळे बागायती भाग

  •    शैक्षणिक व वैद्यकीय हब म्हणून बारामती शहराची ओळख

  •    उद्योग व व्यावसायिक स्तरावर मोठे कारखाने व उद्योग

  •    मोरगाव, जेजुरी, सिद्धटेकसारखी तीर्थक्षेत्र

  •    नियोजित पुरंदर विमानतळामुळे भविष्यात विकासाला मिळणार चालना

  •    पाटस-बारामती-इंदापूर-सराटीपर्यंतच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामुळे दळणवळण अधिक वेगवान

  •    बारामती-फलटण लोहमार्गाचे काम लवकर सुरू होणार. भविष्यात रेल्वेच्या नकाशावर बारामतीला महत्त्व प्राप्त होणार

  •    बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर या ग्रामीण भागात बांधकाम व्यवसायाला तेजी, रोजगाराच्या संधी वाढणार

  •    एमआयडीसीतील उद्योगांना अधिक गती मिळण्यासाठी प्रयत्न झाल्यास अर्थकारण बदलणार

  •    कात्रज, सिंहगड रस्ता, वारजेसारख्या भागात झपाट्याने विकासकामे

  •    गावठाणातील मतदारांपेक्षा बाहेरून आलेल्या मतदारांची संख्या जास्त

  •    भविष्यात खडकवासला मतदारसंघात मेट्रोचा विस्तार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com