‘टेकडी वाचवा’ अभियानास
 नागरिकांचा प्रतिसाद

‘टेकडी वाचवा’ अभियानास नागरिकांचा प्रतिसाद

शिवाजीनगर, ता. २८ : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. टेकडीवर रस्ता बनवल्या जात असल्याने विविधस्तरातून या प्रकल्पाचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव गटाचे विभागप्रमुख प्रवीण डोंगरे यांनी रविवार (ता.२८) वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन केले होते. टेकडीवरील मारुती मंदिर येथे या ट्रेकची समाप्ती झाली.

टेकडीचे महत्त्व समजण्यासाठी आणि पर्यावरण जनजागृती करिता या ट्रेकचे आयोजन केले होते. यावेळी उद्धव गटाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, राम थरकुडे व सूर्यकांत पवार, आकाश रेणुसे, अभिजित धाडावे, निखिल ओरसे, युवराज पारेख उपस्थित होते. यावेळी वेताळ टेकडी कृती बचाव समितीचे तसेच पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, डॉ. सुमिता काळे, प्रदीप घुमरे, ॲड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पर्यावरणप्रेमींच्या हातात ‘सेव्ह वेताळ टेकडी’ असे फलकही दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com