Wed, Feb 8, 2023

एचईएमआरएल येथे रक्तदान शिबिर
एचईएमआरएल येथे रक्तदान शिबिर
Published on : 21 January 2023, 9:49 am
पुणे, ता. २० : उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या (एचईएमआरएल) महिला परिषद (डब्ल्यूसी) आणि वैद्यकीय तपासणी कक्ष यांनी नुकतेच सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) व डिफ्रेंट स्ट्रोक्सच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन एचईएमआरएलचे संचालक डॉ. ए.पी. दास यांनी केले. या प्रसंगी डब्ल्यूसीच्या उपाध्यक्ष संदीप कौर, एएफएमसीचे मेजर डॉ. अनुराग, मेजर डॉ. अनुज शर्मा आदी उपस्थित होते. सशस्त्र दलातील जवानांसाठी रक्तदान करण्याच्या उद्देशाने एचईएमआरएलच्या ११७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.