महात्मा जोतिराव फुले चित्रपटाचा सादरीकरण सोहळा

महात्मा जोतिराव फुले चित्रपटाचा सादरीकरण सोहळा

पुणे, ता. २२ : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था आणि महात्मा फुले प्रतिष्ठान धालेवाडी यांच्या वतीने ‘महात्मा जोतिराव फुले’ चित्रपटाचा सादरीकरण सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी निःशुल्क असल्याची माहिती आयोजकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रकाश नारके, रवी चौधरी, बबनराव सांबळे, पुंडलिक लव्हे उपस्थित होते. या वेळी लव्हे म्हणाले, ‘‘महात्मा जोतिराव फुले यांच्या कर्तृत्वाची माहिती लोकांपर्यंत विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाचे सादरीकरण केले जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती १९५४ मध्ये झाली असून याची पटकथा, संवाद, निर्माता आणि दिग्दर्शक आचार्य प्र. के. अत्रे होते.’’ या चित्रपटाचे सादरीकरण गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट विकास निगम लिमिटेड (एनएफडीसी) येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com