पालखी सोहळ्यापूर्वी अतिक्रमण काढण्याचे आदेश

पालखी सोहळ्यापूर्वी अतिक्रमण काढण्याचे आदेश

पुणे, ता. २४ : श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात सोमवार, १२ जून रोजी आगमन होत आहे. या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली. अतिक्रमण काढा, बेवारस गाड्या उचला, कचरा व्यवस्थापन करून स्वच्छतेची काळजी घ्या असे आदेश आयुक्तांनी दिले.
या वेळी महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त महेश पाटील, आशा राऊत, किशोरी शिंदे, संतोष वारुळे आदी अधिकारी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणे, रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव भवानी पेठेतील मंडपांमध्ये विसाव्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही लावण्यात यावे, पथ विभागाने पदपथ व रस्त्यांची डागडुजी करावी, रस्त्यालगतच्या सीमाभिंती रंगविण्यात याव्यात, पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी असे आदेशही आयुक्तांनी दिले.

आयुक्तांच्या सूचना
- आपतकालीन कक्षांची संख्या वाढवा
- पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष उभारावा
- कक्षात वारकऱ्यांसाठी ओआरएस ची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, इमर्जन्सी मेडिकल आदी गोष्टींची व्यवस्था करा
- ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी फिरते दवाखाने आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com