‘प्रतिमा उत्कट रंग कथा’

‘प्रतिमा उत्कट रंग कथा’

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विद्यार्थी मंडळाच्या कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ‘प्रतिमा उत्कट- रंग कथा २३’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ५.३० वाजता कला दिग्दर्शक श्याम भुतकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. या प्रदर्शनात सुमारे ८० कलाकारांची विविध विषयांवरील आणि विविध माध्यमांतील चित्रे पाहायला मिळतील.
कधी : शुक्रवार (ता. ८) ते सोमवार (ता. ११)
केव्हा : सकाळी १० ते सायंकाळी ८
कोठे : बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता

व्हीनस आर्ट फेस्ट :
चित्रप्रदर्शनासह पोट्रेट, वॉटर कलर प्रकारातील चित्रांची रेखाटने, प्रात्यक्षिके आणि प्रतिथयश कलाकारांना भेटण्याची संधी असलेला ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ कलारसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवात व्यावसायिक व ज्येष्ठ चित्रकार, कलाशाखेचे विद्यार्थी आणि हौशी कलाकार अशा तीन विभागात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. यात १०० कलाकृती पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे.
कधी : शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११)
केव्हा : सकाळी ११ ते सायंकाळी ७
कोठे : राजा रवी वर्मा कलादालन, घोले रस्ता

प्रकट मुलाखत
अपेक्षा मासिकाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पं. यादवराज फड यांच्या प्रात्यक्षिकांसह प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना तबल्यावर अशोक मोरे आणि संवादिनीवर संजय गोगटे साथसंगत करणार आहेत.
कधी : शुक्रवार (ता. ९)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कोठे : गंगाबाई उद्यान विरंगुळा केंद्र, वारजे

पुस्तक प्रकाशन :
डॉ. वरदा संभूस लिखित ‘वारी पिलग्रिमेज- भक्ती, बीईंग अँड बियाँड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर भूषविणार असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे आणि शिवाजी महाराज मोरे उपस्थित राहणार आहेत.
कधी : शनिवार (ता. १०)
केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
कोठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ

संगीत मैफील :
‘कॉस्मिक बीट्स स्टुडियोज अँड इव्हेंट्स’तर्फे डॉ. कल्याणी बोन्द्रे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. त्यांना उपेंद्र सहस्रबुद्धे हे संवादिनीवर तर अमित जोशी हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत.
कधी : शनिवार (ता. १०)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कोठे : कॉस्मिक बीट्स स्टुडियो, बेडेकर गणपती मंदिरासमोर, रामबाग कॉलनी, पौड रोड

हिंदी कवी संमेलन :
हिंदी विवेक मासिक पत्रिका आणि रोटरी क्लब (जिल्हा- ३१३१) यांच्यातर्फे हिंदी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुरेश मिश्र, डॉ. रजनीकांत मिश्र, सुनील सावरा, संजय बंसल, ज्योती त्रिपाठी, मुन्ना बैटरी आदी कवी सहभागी होणार आहेत.
कधी : शनिवार (ता. १०)
केव्हा : सायंकाळी ७ वाजता
कोठे : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कलामंदिर, येरवडा

‘जी. ए. एक अनवट वाट’ :
जी. ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काव्यकृष्णा प्रस्तुत ‘जी. ए. एक अनवट वाट’ या साहित्यिक आणि रंगमंचीय आविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना शिल्पा देशपांडे यांची असून संहितालेखन आणि दिग्दर्शन संज्ञा कुलकर्णी यांचे आहे.

कधी : रविवार (ता. ११)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कोठे : जोत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रस्ता

‘मोठी माणसं’ :
‘मराठबोली, पुणे’ यांच्यातर्फे ‘मोठी माणसं’ या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी आणि गझलकार रमण रणदिवे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. योगिता पाखले त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
कधी : रविवार (ता. ११)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कोठे : सावरकर सभागृह, डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता

‘पु. ल. स्मृती सायंकाळ’ :
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘पु. ल. स्मृती सायंकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी ‘पुलंच्या पाऊलखुणा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच पुलंच्या अनेकविध भाषणांतील दुर्मिळ दृष्यफितींवर आधारित ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हा लघुपट दाखविणार आहे.
कधी : सोमवार (ता. १२)
केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
कोठे : लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com