pune fraud crime
pune fraud crime sakal

Pune Fraud Crime : सीबीआयच्या बनावट नोटीशीने उद्योजकाला एक कोटीचा गंडा

केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) बनावट नोटीस पाठवून औंधमधील उद्योजकाची एक कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) बनावट नोटीस पाठवून औंधमधील उद्योजकाची एक कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित उद्योजकाने फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उद्योजकाचा वाहनांचे सुटे भाग बनविण्याचा व्यवसाय आहे.

तीन मार्चला चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. दूरसंचार मंत्रालयातील अधिकारी बोलत असल्याची बतावणी त्याने केली. तुमच्या मोबाईलवरून नागरिकांना फसवे संदेश पाठविले जात आहेत. यामुळे मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर उद्योजकाच्या मोबाईलवर आणखी संपर्क साधला.

सीबीआयच्या नावाने बनावट नोटीस त्यांना पाठविण्यात आली. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याने सीबीआय तपास करीत असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली. याबाबत अन्य कोणाला माहिती देऊ नये, असेही त्याने सांगितले. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात काळा पैसे असल्याने व्यवहारांची तपासणी करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्याचेही चोरट्याने सांगितले.

चोरट्याने उद्योजकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेत खात्यातील निधी अन्य खात्यांत हस्तांतरित करण्यास सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा कायदा, बेकायदा आर्थिक व्यवहार प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता असल्याची भीतीही त्याने दाखविली.

pune fraud crime
Pune Railway News : पुण्याहून १९६१ विशेष रेल्वे गाड्या ; तिकीटदर जास्त,उत्पन्नात वाढ

बँक खात्यातील रक्कम त्वरित हस्तांतरित करण्याची सूचना देऊन चोरट्याने एक कोटी तीन लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकाने ॲड. सत्या मुळे यांच्याशी संपर्क साधला. ॲड. मुळे यांनी त्वरित मदत करून पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com