कलाटे यांच्याकडे ३५ कोटींची संपत्ती

कलाटे यांच्याकडे ३५ कोटींची संपत्ती

पिंपरी, ता. ७ ः महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत बंडखोरी करत मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे एकूण ३५ कोटी ६२ लाख ४० हजार ५९४ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एक कोटी १० लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

कलाटे यांचा शेती व व्यापार आहे. बी. कॉम. पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. तर त्यांच्या नावे रहाटणीत घर व सोळू, नेरे येथे शेतजमीन आहे.

कलाटे यांच्याकडील मालमत्तेची स्थिती
- सोने ः १५ तोळे
- जंगम मालमत्ता ः एक कोटी ४० लाख १० हजार ५९३ रुपये
- स्थावर मालमत्ता ः ३४ कोटी २२ लाख २९ हजार ९९१ रुपये
- देणे किंवा कर्ज ः एक कोटी १० लाख सात हजार २४८ रुपये
- वार्षिक उत्पन्न ः ६२ लाख ४० हजार २७० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com