‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटमध्ये दोघांना संधी

‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटमध्ये दोघांना संधी

पुणे, ता. १७ ः महाविद्यालयीन तरुणांमध्ये नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या माध्यमातून लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबविण्यात येतो. शहरातील महाविद्यालयांत मतदानाद्वारे ‘यिन’ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामधून राज्यस्तरावर शहराचे नेतृत्व करण्यासाठीची निवडप्रक्रिया नुकतीच पार पडली. यात यिनच्या शहराध्यक्षपदी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानचा विद्यार्थी अभिषेक कोल्हे आणि शहर कार्याध्यक्षपदी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, गणेशखिंड येथील विद्यार्थिनी श्रद्धा पठारे यांची निवड झाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरावर यिन शॅडो कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.


कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाहक निवेदिता एकबोटे, ‘सकाळ’चे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर उपस्थित होते. राज्य समन्वयक अधिकारी अनिकेत मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

परीक्षक आरती पाठक म्हणाल्या, ‘‘यिनमुळे युवकांना एक सामाजिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. युवकांचा सामाजिक उपक्रमात सहभाग वाढून त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत असून, जबाबदार नागरिक घडत आहेत.’’ तर ‘यिन''च्या निवड प्रक्रियेतील सर्वच उमेदवार तयारीने आले असल्याने निवडप्रक्रिया चुरशीची झाली. निवड प्रक्रियेतील लेखी परीक्षा मुलाखत उमेदवारांची कस पाहणारी होती. त्यांना हा अनुभव पुढे निश्चितच कामी येईल’, असे मत जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल काळे यांनी व्यक्त केले.

सुशांत खोपडे, सुचित्रा मेदादकर, विशाखा बेके, दीपक शेळके यांनी परीक्षण केले, तर यिन शहर अध्यक्ष निवड प्रक्रियेचे आयोजन शंतनू पोंक्षे, आकाश पांढरे व अनुजा पाटील यांनी केले.
--------
कोट
महत्वाकांक्षी विद्यार्थांना अचूक मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्याकडून समाजासाठी भरीव कार्य घडू शकते. विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाला मार्गदर्शनद्वारे आकार देण्याचे काम ‘यिन’च्या माध्यमातून केले जात आहे. यामधून अशा तरुणांकडून समाजामध्ये निश्चित बदल घडवला जाईल.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग
-------------
तरुणांनी यिनच्या माध्यमातून समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी विविध उपक्रम राबवावेत. ‘यिन’द्वारे तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन युवकांना नवनेतृत्व मिळेल.
- निवेदिता एकबोटे, उपकार्यवाहक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
----------
''यिन'' व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा मानस आहे. मिळालेल्या संधीमुळे स्वतःसह इतर सदस्यांचाही विविध उपक्रमांत सहभाग वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
- अभिषेक कोल्हे, शहराध्यक्ष
---------------------------
''यिन'' हे युवकांचे हक्काचे व्यासपीठ असून, त्यावर पदाधिकारी होण्याची मिळालेली संधी अभिमानास्पद बाब होती.
- श्रद्धा पठारे, कार्याध्यक्ष
-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com