‘एमआयटी’तर्फे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

‘एमआयटी’तर्फे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पुणे, ता. १७ : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२३’ या १६व्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन सोमवार (ता. २०) ते शुक्रवार (ता.२४) या कालावधीत एमआयटी, कोथरूड येथे करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) दुपारी चार वाजता होणार आहे.

‘एमआयटी’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ‘एमआयटी’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी ही माहिती दिली. स्पर्धेत क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, कबड्डी यांसारख्या ११ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, पदक व रोख रक्कम अशी एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे, प्रशस्तिपत्रके दिली जाणार आहेत. जवळपास चार हजार स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभात भारतीय लॉनटेनिसपटू अंकिता रैना, भारतीय लॉनटेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २४) ‘एमआयटी’च्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com