शेवटचा रविवार ठरला प्रचारवार

शेवटचा रविवार ठरला प्रचारवार

पुणे,ता. १९ : प्रचारातील शेवटचा रविवार आणि शिवजयंती महोत्सव असा योग साधत उमेदवारांनी आज वैयक्तिक प्रचारावर भर दिला. दरम्यान शेवटच्या टप्प्यात प्रचार आल्याने पुढील आठवड्यात प्रदेश, देशपातळीवरील नेते प्रचारासाठी रिंगणात उतरणार असल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुढील रविवारी (ता. २६) मतदान होणार आहे. तर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. त्याच शिवजयंती मिरवणूक कसबा विधानसभा मतदारसंघातून निघत असल्याने या संधीचा फायदा घेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याची संधी दोन्ही उमेदवारांनी या निमित्ताने साधली.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सायंकाळनंतर मतदारसंघात ठिकठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्न केला. पक्षाचे निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, प्रदेश काँग्रेसचे सचिव नदीम खान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते या सभेत सहभागी झाले होते. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कसबा मतदारसंघातील मराठा समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन चर्चा केली. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होत गाठीभेटी घेतल्या. या वेळी त्यांच्यासमवेत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर भाजपच्या शहर पातळीवर वरिष्ठ नेत्यांची दुपारी बैठक झाली. त्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणनीती निश्चित करण्यात आली. तर सायंकाळनंतर रासने यांनी मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com