‘प्रवासी वाहतुकीसाठी पात्र नसलेल्या वाहनांना परवानगी नको’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रवासी वाहतुकीसाठी पात्र
नसलेल्या वाहनांना परवानगी नको’
‘प्रवासी वाहतुकीसाठी पात्र नसलेल्या वाहनांना परवानगी नको’

‘प्रवासी वाहतुकीसाठी पात्र नसलेल्या वाहनांना परवानगी नको’

sakal_logo
By

पुणे, ता. २२ मोटार वाहतूक कायदा व नियमांमधेच खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मनाई आहे, असे असताना खासगी वाहनांच्या प्रवासी वाहतुकीचे नियम ठरविण्यासाठी नेमलेली समितीच गैरलागू आहे. प्रवासी वाहतुकीसाठी पात्र नसलेल्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही, असे नियम राज्य सरकारने करावे, अशी मागणी रिक्षा पंचायतीने बुधवारी बाईक टॅक्सीच्या समुच्चयक धोरण समितीसमोर केली.

बाईक टॅक्सी अग्रिग्रेटर (समुच्चयक) च्या धोरण विषयी प्रवासी वाहतूकदार संघटनांचे मत जाणून घेण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक झाली. मुंबई उच्च न्यायालयात बाईक टॅक्सी विषयी झालेल्या सुनावणीत दिलेल्या निर्देशानुसार बाईक टॅक्सीसाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. माजी अधिकारी रमानाथ झा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीचे सचिव व सहायक परिवहन आयुक्त कैलास कोठावदे यांनी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांना रिक्षा चालकांची बाजू मांडण्यासाठी या बैठकीत निमंत्रित केले होते. कोठावदे यांच्याशी चर्चा करून पंचायत समितीने आपली बाजू मांडली आहे.