चिमणी दिनानिमित्त
‘आरंभ’तर्फे कार्यक्रम

चिमणी दिनानिमित्त ‘आरंभ’तर्फे कार्यक्रम

पुणे, ता. २३ ः जागतिक चिमणी दिनानिमित्त २० मार्च रोजी कोथरूडमधील एमआयटी कॉलेजमध्ये आरंभ फाउंडेशनतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस साजरा करण्याबरोबरच पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे आणि पंडित कोपर्डे त्या प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.
जगभरात दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस (स्पॅरो डे) साजरा करतात. हे लहान पक्षी जगाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात असून आपल्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे महत्त्व असूनही अलीकडच्या वर्षांत अधिवास नष्ट होणे, कीटकनाशके आणि इतर धोक्यांमुळे चिमण्यांची लोकसंख्या कमी होत आहे. म्हणूनच जागतिक चिमणी दिन हा या प्रिय पक्षी आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्याची आठवण करून देतो.
आरंभ फाउंडेशनचे उद्दिष्ट हे फक्त पक्षी संवर्धनापुरतेच मर्यादित नसून शहरी जीवनामध्ये जखडलेल्या माणसाला निसर्गाची जोडण्याचा आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि फाउंडेशनचे संस्थापक उमेश पवार यांनी दिली.

कार्यक्रम कोणासाठी?
पक्षीप्रेमी, पर्यावरणवादी, निसर्ग प्रेमी, विद्यार्थी, नागरिक, वास्तूविशारद, इंटेरियर डिझायनर, बांधकाम व्यावसायिक आणि एकंदरीत, संवर्धनाबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या आणि वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणामध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com