सखी सांगतेय
अॅक्युप्रेशरचे घरगुती उपचार महिलांना शिकवताना

सखी सांगतेय अॅक्युप्रेशरचे घरगुती उपचार महिलांना शिकवताना

नीला शर्मा

पुण्यातील महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अॅक्युप्रेशर उपचार विभाग समन्वयक निशा शिधये, यांनी दोन वर्षांत अनेक महिलांना ही उपचारपद्धती शिकवली आहे. ‘झालाच तर फायदा, नाही तर अपाय काहीच नाही,’ हा अॅक्युप्रेशरचा गुणधर्म त्या सांगतात. यामुळेच गृहिणींना घरगुती उपचारांसाठी, नवीन कौशल्य शिकायची प्रेरणा मिळते.

निशाताई म्हणाल्या, ‘‘आपले शरीर ऊर्जेवर चालते. तिच्यात असंतुलन निर्माण झाल्यास आजार होतात. ते संतुलन साधण्यासाठी अॅक्युप्रेशर उपचार पद्धती उपयोगी पडते. सर्दी, पडसे, डोकेदुखी, अपचन वगैरे त्रास जाणवल्यास या उपचारांनी बरे वाटते. औषधे टळतात. रंग चिकित्सा, चुंबकांचा वापर व धान्यांचा वापर, या तीन पद्धती यात वापरल्या जातात. वेगवेगळ्या रंगांमध्ये विशिष्ट प्रकारची कंपने असतात. मी स्वतः माझ्या हातांवरील ठराविक बिंदूवर काळ्या रंगाचे ठिपके देते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग मला होतो आहे. माझ्या मुलीला झालेल्या अपचनावर उपाय म्हणून हातांच्या ठराविक बिंदूंवर मेथी दाणे ठेवून ते चिकटपट्टीने चिकटवले. तिलाही उपयोग झाला. या पद्धतीत शरीरातील विविध अवयवांसाठी पाय व तळहातांवर विशिष्ट बिंदू महत्त्वाचे मानले जातात. मेथी, राजमा अथवा मटारच्या दाण्यांना त्या बिंदूंवर चिकटवले जाते. याने संबंधित बिंदूंवर हलकासा दाब पडतो. त्याने तेथील ऊर्जा संतुलित करायला मदत होते.’’

निशाताईंनी असेही सांगितले की, अलाहाबादच्या प्रयागराज या संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार आमच्या विभागात हे शिकवले जाते. चुंबकाच्या घन व ऋण या गुणधर्मांचा वापर करून उपचार केले जातात. यायोगे त्या ठिकाणची ऊर्जा गरजेप्रमाणे जास्त किंवा कमी केली जाते. आपले तळहात हे शरीराच्या पुढील भागाच्या तर हाताचा पंजा हा मागील भागासाठी उपचार करायला उपयुक्त असतात

नगण्य खर्च असलेली पद्धत
जवळपास नगण्य खर्च असलेली ही पद्धती साधी, सोपी आहे. निसर्गोपचारा अंतर्गत ती येते. हिच्या माध्यमातून बरेचसे विकार घरगुती उपचारांनी बरे करता येतात. हिचा अपाय नसल्याने करून बघायला हरकत नाही, हे मी कित्येकजणींना सांगितले. त्यांच्यापैकी काहीजणी ही पद्धती आमच्याकडून शिकली आहे, असे निशाताईंनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com