वास्तुकला मराठी परिषद पडली पार

वास्तुकला मराठी परिषद पडली पार

पुणे ता. २७ ः राज्यस्तरीय वास्तुकला मराठी परिषद नुकतीच मराठी भाषा गौरव दिनी पार पडली. राज्य शासनाचा तंत्रशिक्षण विभाग व भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयात ही परिषद पार पडली. परिषदेचे उद्‌घाटन भारतीय कला प्रसरिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक, सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ.मोहिनी पेटकर यांच्या हस्ते झाले. वास्तुकलेसंदर्भातील अनुभव संपन्न व्यक्तींचे शोधनिबंध या परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने वाचकांकरिता मराठीतून उपलब्ध केले आहेत.
डॉ. पेटकर म्हणाल्या, ‘‘संतांनी मराठी भाषा रुजविली, छत्रपती शिवाजी महाराजांनी पर चक्रातून वाचविली, तर साहित्यिकांनी ती वाढविली आहे. मराठीचा समृद्ध वारसा आपण विश्वासाने जपला व वाढविला पाहिजे.’’
यावेळी डॉ.अंजली कमलदानी यांनी बीजभाषण केले. प्राचार्य डॉ. अभिजित नातू यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पराग नारखेडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा अतुल भागवत, प्रा.सुषमा पराशर व प्रा. प्रज्ञापद पत्की या परिषदेच्या समन्वयक होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com