नळ स्टॉप चौकाजवळील गल्ल्यांचे होणार रुंदीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळ स्टॉप चौकाजवळील
गल्ल्यांचे होणार रुंदीकरण
नळ स्टॉप चौकाजवळील गल्ल्यांचे होणार रुंदीकरण

नळ स्टॉप चौकाजवळील गल्ल्यांचे होणार रुंदीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः कर्वे रस्ता विधी महाविद्यालय रस्ता येथील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी या कॅनॉल रस्त्याला लागून असलेल्या नळ स्टॉप चौकाजवळील गल्ल्यांचे रुंदीकरण तीन मीटर करण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे आहे. येथील दोन रस्ते मोठे करण्यासाठी चार विभागांनी संमती दिली असून, त्यावर आता नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.
मौजे एरंडवणा येथील अंतिम भूखंड क्रमांक ७०/५ सी सर्वे क्रमांक ४७/५ समोरील कॅनॉलपर्यंत जाणारा रस्ता सहा मीटर रुंद आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम २१० अंतर्गत नऊ मीटर करण्यास मान्यता देण्यात आली. यासंदर्भात माजी नगरसेविका वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांनी एक फेब्रुवारी २०२२ रोजी यांचा ठराव मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. यावर आयुक्तांनी पथ विभाग, बांधकाम विकास विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि प्रकल्प विभाग या चार विभागांचा अभिप्राय मागविला होता. या चारही विभागांनी रस्ता रुंदीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवून घेऊन, त्यावर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला आहे.

सोसायट्यांचे फ्रंट मार्जिन जाणार
या भागातील गल्ल्यांचे रुंदीकरण केल्यानंतर नऊ मीटर रस्ता होणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फ्रंटमार्जीनच्या जागा दीड मीटरने भूसंपादन करावे लागणार आहे. सोसायट्यांना यासाठी टीडीआर किंवा एफएसआयच्या माध्यमातून मोबदला देण्याचे पर्याय बांधकाम विभागाने ठेवले आहेत.