प्रमोद चौगुले प्रथम, शुभम पाटील दुसरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोद चौगुले प्रथम, शुभम पाटील दुसरा
प्रमोद चौगुले प्रथम, शुभम पाटील दुसरा

प्रमोद चौगुले प्रथम, शुभम पाटील दुसरा

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात प्रमोद चौगुले ६३३ गुणांसह राज्यात प्रथम आला असून, ६१६ गुण प्राप्त करत शुभम पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुलींमध्ये सोनाली मेत्रे प्रथम, तर राज्यात तिसरी आली आहे. उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक, तहसीलदार यांच्यासह २० पदांच्या ४०५ जागांसाठी ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
मे २०२२ मध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमोद चौगुले हे २०२० च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आले होते. त्या वेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती. आयोगाच्या वतीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्यासाठी ३ मार्च ते १० मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.