लहान मुलांच्या विकासाकडे पालकांनी लक्ष द्यावे ः डॉ. पंडित

लहान मुलांच्या विकासाकडे पालकांनी लक्ष द्यावे ः डॉ. पंडित

पुणे, ता. १२ : ‘‘लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात पहिली काही वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या दरम्यान पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. बाल विकासाबद्दल काळजी करण्याचे काही कारण असल्यास पालकांनी बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधणे गरजेचे असते,’’ असे केईएम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद पंडित यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात ‘तेर देस होम्स’ (टीडीएच) ‘रिहॅबिलिटेशन ॲण्ड मॉरिस चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’तर्फे आणि सिद्ध दिव्यांग फाउंडेशनच्या सहयोगाने ‘हेल्दी बेबी’ हे मल्टिमीडिया अॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा पाठपुरावा घेण्यास मदत होणार आहे. हे अॅप एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे. त्या कार्यक्रमात डॉ. पंडित बोलत होते. या वेळी डॉ. सुधा चौधरी उपस्थित होत्या.
डॉ. पंडित म्हणाले, ‘‘लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा विचार केला तर पहिली काही वर्षे महत्त्वाची असतात. या प्लॅटफॉर्मवर सुमारे ६० व्हिडिओ आहेत, जे पालकांना उपयुक्त ठरू शकतील. या माध्यमातून मुलांच्या विकासाचे प्रारंभिक टप्पे जाणून घेण्यास मदत होणार आहे.’’
सिद्ध दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक उदय मेहता म्हणाले, ‘‘सध्या हे अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून पुढील काळात त्याचा विस्तार होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com