स्पर्धा परीक्षार्थींना वयोमर्यादेची सवलत

स्पर्धा परीक्षार्थींना वयोमर्यादेची सवलत

पुणे, ता. ३ ः कोरोना काळात प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती आणि रखडलेल्या परीक्षांमुळे अनेक उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली होती. राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. वयाच्या सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून, सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची आणि सरळसेवेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सर्वच भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना दोन वर्षांच्या वयोमर्यादेत सवलत मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून वारंवार करण्यात आली होती. तसेच राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी केली, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. अखेरीस शुक्रवारी (ता.३) संध्याकाळी यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आले.

निर्णय काय?
- ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या सर्व भरती प्रक्रियेत वयोमर्यादेत दोन वर्षांची सवलत. म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे, तर मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षांची अट शिथिल.
- शासन निर्णय प्रसिद्ध होण्याआधीच्या सर्व जाहिरातींना हा निर्णय लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com