पुणे बुक फेअरचे गुरुवारी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे बुक फेअरचे गुरुवारी आयोजन
पुणे बुक फेअरचे गुरुवारी आयोजन

पुणे बुक फेअरचे गुरुवारी आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन ‘पुणे बुक फेअर’ म्‍हणजे ‘पुणे पुस्तक जत्रा’ या मालिकेतील २०वे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चार दिवसीय प्रदर्शनात इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, आणि इतर भाषेतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक पी.एन.राजन आणि दीपक करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनात देशातील शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, नामवंत पुस्तक विक्रेते-वितरक, प्रकाशन संस्था, माहिती, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्‍तके, मासिके, ग्रंथ आदी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता येरवडा येथील क्रिएटी सिट मॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन गुरुवार (ता. ९) ते रविवार (ता. १२) दरम्यान क्रिएटी सिटी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.