‘अब नॉर्मल होम’चा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अब नॉर्मल होम’चा 
वर्धापन दिन उत्साहात
‘अब नॉर्मल होम’चा वर्धापन दिन उत्साहात

‘अब नॉर्मल होम’चा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः कोथरूडमधील ‘अब नॉर्मल होम’ या विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्राचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात नुकताच साजरा झाला. दिव्यांग मुलांच्या, विकासासाठी विनाअनुदानित तत्वावर ही संस्था कार्यरत आहे. संस्थेत मतिमंद, स्वमग्न, डाऊन सिंड्रोम, अतिचंचल, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात आदी प्रकारची ४५ विशेष मुले आहेत.

‘स्वातंत्र्य ७५’ अशी संस्थेची या वर्षीची थीम होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमात मुलांचे सादरीकरण झाले. त्यात नाच, गाणी, शॅडो प्ले, शॉर्ट फिल्म याचा समावेश होता. हिरेमठ म्हणाले, ‘‘वेदना स्वतःच्या असतात, संवेदना दुसऱ्यांच्या असतात. वाढ आणि विकासाच्या संधी दिल्यास ही मुले शिकू शकतात. पालकांचा मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.’’ कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक पंकज मिठभाकरे, संचालिका किशोरी पाठक, जलतरंग वादक मिलिंद तुळणकर, संघाचे महेश टांकसाळे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.