मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 
आज वादळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता

पुणे, ता. ७ : राज्यात मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात गारपिट झाली आहे. बुधवारी (ता. ८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात मंगळवारी (ता. ७) पुणे, नागपूर, सांताक्रूझ, मुंबई, वर्धा, छत्रपती संभाजीनगर आदी परिसरात पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. पावसामुळे कोकण वगळा उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ११ अंश सेल्सिअसने घट झाली. राज्यात येत्या गुरुवारपर्यंत (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता नैॡत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे बुधवारी ही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, नगर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, बीड, यवतमाळ, अमरावती येथे बुधवारी (ता. ८) पावसाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com