खटला निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

खटला निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

पुणे, ता. ८ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटला वेळेत निकाली निघावा यासाठी न्यायालयाने आता कालबद्ध कार्यक्रम (टार्इम बॉण्ड प्रोग्रॉम) निश्‍चित केला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये या खटल्याच्या सुनावणीसाठी ठराविक तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटला लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे.
मार्च महिन्यात १६, १७ आणि १८ तर १० ते २१ एप्रिल दरम्यान या दिवशी या खटल्याची दररोज सुनावणी होणार आहे. या तारखांना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आरोपींच्या वकिलांना त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान साक्षी पुरावे आणि उलटतपसाणीचे कामकाज पूर्ण होर्इल. तसेच झाल्यास खटला पुढील दोन महिन्यात निकाली लागण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.

काय आहे आत्ताची स्थिती?
खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सीबीआयकडून एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच आणि गुन्ह्याच्या संबंधित इतरांची साक्ष घेण्यात आली आहे. तर आता पुढील तारखांना या गुन्ह्याशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगर पालिकेच्या साफसफार्इ विभागातील कर्मचाऱ्याची देखील साक्ष नोंदविण्यात आली आहे. साक्ष पुरावा झाल्यानंतर खटल्यावर निकाल होणार आहे.

खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी तारखा निश्‍चित झाल्यामुळे साक्ष-पुराव्याचे कामकाज वेळेत संपेल. त्यामुळे खटला लवकर निकाली काढण्यास मदत होर्इल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
- प्रकाश सूर्यवंशी, विशेष सरकारी वकील, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय)

उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसतानाही सुमारे अडीच वर्ष या खटल्याची सुनावणी झाली नाही. मात्र आता खटला आरोपींना जामीन मिळण्याच्या स्थितीत आल्यानंतर सुनावणीची घार्इ केली जात आहे. निश्‍चित तारखांनुसार खटला चालविण्याबाबत आमची काहीच हरकत नाही. खटला चालविण्यास आम्ही तयार आहोत.
- ॲड. प्रकाश साळशिंगीकर, आरोपींचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com