बलात्कारप्रकरणी २१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

बलात्कारप्रकरणी २१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे, ता. ८ : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला विशेष न्यायालयाने २१ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी हा निकाल दिला. सागर अरुण चव्हाण (वय ३३, रा. भोसरी) असे शिक्षा करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ११ एप्रिल २०१५ रोजी मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ती रडत घरी आली. तेव्हा तिला आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने आरोपी सागर चव्हाण याने गैरकृत्य केल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांनी पतीला फोन करून या घृणास्पद प्रकाराबाबत कल्पना दिली. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चव्हाणला अटक केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी नऊ साक्षीदार तपासले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com