विकसकाची कारागृहात रवानगी

विकसकाची कारागृहात रवानगी

पुणे, ता. ९ : लाभार्थ्यांना म्हाडाअंतर्गत सदनिका देण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊनही त्यांना मुदतीत सदनिका न देता लाभार्थी, म्हाडासह सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यवसायिकांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विकसकास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्रकाश येवला (वय ३५ रा. रहाटणी पुणे) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हाडातर्फे १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये ‘सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने’अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर गृहप्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने त्यापैकी २० टक्के क्षेत्रावर म्हाडासाठी सदनिका बांधून देणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश २७ जानेवारी २०१८ रोजी काढला आहे. त्यानुसार, पिंपरी चिंचवड येथे येवला याच्या ‘भूमी कन्स्ट्रक्‍शन’ या कंपनीने म्हाडाला २० टक्के सदनिका द्यायचे निश्‍चित केले होते. येवला याच्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झालेले नसतानाही, त्यांनी ७० टक्के काम पूर्ण झाल्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडे सादर केला. त्यानंतर त्याने म्हाडाकडून लाभार्थ्यांची यादी निश्‍चित करून स्वतःकडे घेतली. त्यानुसार, संबंधित लाभार्थ्यांकडून ६० ते ७० टक्के रक्कम घेत त्यांच्याशी करारनामेही केले. त्यानंतरही बांधकाम व्यावसायिकाने लाभार्थ्यांना दिलेल्या मुदतीत सदनिका बांधून दिल्या नाहीत. म्हाडातर्फे विधी सल्लागार ॲड. श्रीकांत ठाकूर, पुणे मंडळ व मालेगावकर ॲड. असोसिएटतर्फे
ॲड सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले. ही संपूर्ण कार्यवाही पुणे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com