मानव कल्याणासाठी अग्निहोत्र

मानव कल्याणासाठी अग्निहोत्र

पुणे, ता. १२ ः भारतीय वैदिक परंपरेतील पंचमहाभूतांमध्ये अग्नीचे विशेष असे महत्त्व आहे. कारण, ऊर्जा निर्माणही करता येत ना`ही आणि नष्टही. त्यामुळे अग्निहोत्राच्या नित्य आचरणामुळे जल, मृदा आणि वायु संवर्धनासाठी मदत होते. त्याचबरोबर मनःशांतीच्या माध्यमातून मानव कल्याणाचे ध्येयही साध्य होते, असे मत आयुर्वेद तज्ज्ञ आणि विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी व्यक्त केले.
भारत ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवीत असताना ‘द सत्संग फाउंडेशन’तर्फे आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून सिव्हिल २०’ गटातील सदस्यांसाठी ‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पाणी’ या विषयावर दोन दिवसीय जल परिषद आयोजित करण्यात आली आहे. यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात अग्निहोत्राने झाली. त्यावेळी त्याचे महत्त्व सांगताना डॉ. राजीमवाले यांनी ही माहिती दिली. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू श्री एम, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह आदी उपस्थित होते.
जागतिक अग्निहोत्र दिनानिमित्त डॉ. राजीमवाले यांनी अग्निहोत्राची पद्धत आणि स्तोत्रांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पंच महाभूतांचे वेदांमध्ये महत्त्व आहे. त्यात पाण्याला जीवन म्हणून संबोधले असून प्राण, जीवनाचा स्रोत म्हणून त्याकडे पाहिले जाते. म्हणूनच भारतीय संस्कृती पवित्र नद्यांच्या काठावर वसली तिथेच आध्यात्मिक ज्ञानाचा विकास झाला.’’

अग्निहोत्रासंबंधी संशोधन...
आधुनिक विज्ञानाच्या भाषेत अग्निहोत्राचे महत्त्व विशद करण्यासाठी काही वैज्ञानिक प्रयोग केल्याचे डॉ. राजीमवाले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ३०० लोकांवर चाचणी करण्यात आली. त्यातील ७५ टक्के लोकांमध्ये ताणतणाव कमी झाल्याचे व शांती मिळाल्याचे लक्षात आले. तसेच, पाणी व हवा शुद्धीकरणासाठी प्रयोग करण्यात आले, त्यातील प्राथमिक निष्कर्ष निश्चितच सकारात्मक आहे. अजून पुढे जात संशोधन करण्याची आमची तयारी आहे.’’

डॉ. राजीमवाले म्हणाले....
- ऋग्वेदामध्ये अग्नीचे महत्त्व अधोरेखित केले आहे
- सर्व आध्यात्मिक प्रक्रिया या निसर्गाशी जोडणाऱ्या आहेत
- निसर्ग संवर्धन आणि मानव कल्याणासाठी अग्निहोत्र गरजेचे
- आध्यात्मिक उदयासाठी वेदांनीच यज्ञाची परंपरा सांगितली
- जल आणि हवा शुद्धीकरणासाठी अग्निहोत्राचा उपयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com