डिझेल न भरताच एक लाखांची फसवणूक

डिझेल न भरताच एक लाखांची फसवणूक

पुणे, ता. १२ : भारती हॉस्पिटलमधील एका चालकाने रुग्णवाहिकेत डिझेल न भरताच पेट्रोकार्डवर डिझेल भरल्याची नोंद करून पंपचालकाकडून एक लाख १६ हजारांची रोकड घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी प्रवीण रघुनाथ जाधव (वय ४५, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर प्रकाश साळवी (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल कला आहे. हा प्रकार भारती हॉस्पिटलमध्ये १ एप्रिल २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी भारत पेट्रोलियमचे पेट्रो कार्ड वापरण्यात येते. पंपावर इंधन भरल्यानंतर त्याचे पंपचालकास बिल अदा केले जाते. रुग्णवाहिका चालक पेट्रोकार्डचा वापर करून डिझेल भरल्यानंतर ते कार्ड पुन्हा कार्यालयात ठेवतात.
दरम्यान, रुग्णालयाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख जयंत भेडसगावकर यांना दोन जानेवारी रोजी एक पेट्रोकार्ड आढळून आले नाही. त्यांनी माहिती घेतली असता ते कार्ड साळवी याच्याकडे होते. त्याने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी या कार्डवरुन प्रत्येकी चार हजार रुपये काढल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्व पेट्रो कार्डवरून झालेल्या व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी साळवी याने गेल्या आठ महिन्यांत वेगवेगळ्या पेट्रो कार्डवरुन इंधन भरण्याऐवजी एका पेट्रोल पंपावरून रोख १ लाख १६ हजार रुपये घेतल्याचे समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com