‘किराणा’च्या दस्तावेजाच्या डिजिटायझेशनला गती
पुस्तके, लेख, चित्रफिती असा २५ जीबींचा डेटा संगीत अभ्यासकांसाठी खुला

‘किराणा’च्या दस्तावेजाच्या डिजिटायझेशनला गती पुस्तके, लेख, चित्रफिती असा २५ जीबींचा डेटा संगीत अभ्यासकांसाठी खुला

पुणे, ता. १३ : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील महत्त्वाच्या घराण्यांपैकी एक असलेल्या किराणा घराण्याच्या विविध दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याचे काम ‘किराणा घराना ग्रंथालय व संसाधन केंद्रा’तर्फे हाती घेण्यात आले आहे. या कामाने आता गती घेतली असून, मागील सहा महिन्यांत पुस्तके, लेख यांसह रेकॉर्ड्स, चित्रफिती, छायाचित्रे आदींचा समावेश असलेला सुमारे २५ जीबींचा डेटा तयार झाला आहे. हा संग्रह आता संगीत अभ्यासकांसाठी विनामूल्य खुलादेखील असणार असेल.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुढाकारातून स्वरमयी गुरुकुलतर्फे या केंद्राची स्थापना करण्यात आली. या विषयी केंद्राचे समन्वयक प्रसाद भडसावळे म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत संगीतविषयक साहित्य, त्यातही एखाद्या घराण्याशी निगडित असलेल्या साहित्याची वानवा आहे. त्यामुळे अभ्यासकांना संशोधनात अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी किराणा घराण्याचे एखादे स्वतंत्र माहितीवजा संशोधन केंद्र असावे, असे डॉ. प्रभा अत्रे यांना वाटले. त्यातून या केंद्राची स्थापना झाली.’’

सध्या रोज सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत केंद्र सुरू असते. आजघडीला पुस्तकांचे स्कॅनिंग व त्याचे डिजिटायझेशन सुरू असून, पुस्तके व नियतकालिकांचे संकलनही केले जात आहे. कोणाकडे किराणा घराण्याशी संदर्भात पुस्तके, लेख, छायाचित्रे, खासगी वा सार्वजनिक मैफलींचा संग्रह असल्यास तो या केंद्राकडे जमा करावा, असे आवाहन डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांनी केले आहे.

केंद्राकडे उपलब्ध साहित्य
- किराणा घराण्याशी संबंधित ३०० पुस्तके
- सांगीतिक मैफली व गायन सभांचा २५ जीबीचा डेटा
- गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, सवाई गंधर्व, डॉ. प्रभा अत्रे आदी दिग्गजांवरील पुस्तके व त्यांचे गायन
- डॉ. प्रभा अत्रे लिखित सांगीतिक पुस्तकांसह किराणा घराण्यावरील लेख आणि व्यक्तिचित्रे
- जुन्या कॅसेट आणि जुने रेकॉर्डिंग डिजिटल माध्यमात उपलब्ध

केंद्र का महत्त्वाचे?
(प्रभा अत्रे यांचा कोट देत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com