आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेत ‘इंडो फिलिपिन्स व्हर्च्युअल एज्युकेशन’ कार्यक्रम

आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेत ‘इंडो फिलिपिन्स व्हर्च्युअल एज्युकेशन’ कार्यक्रम

पुणे, ता. १३ : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत ‘आयपीव्हीईई इंडो फिलिपिन्स व्हर्च्युअल एज्युकेशनल एक्स्चेंज’ कार्यक्रम झाला. यात दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला. फिलिपिन्समधील शिक्षकांनी त्यांच्या मूळाक्षरांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी साधलेल्या संवादातून शाळा, कुटुंब, देशातील प्रसिद्ध ठिकाणे अशा माहितीची देवाण-घेवाण केली.
या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. कॅथलिन मुरे, शाळेचे अध्यक्ष सुभाष परमार, मलेशियाच्या मंत्रिमंडळातील शिक्षण समितीच्या सदस्या थानबीर कौर, फिलिपिन्सच्या उनिडा ख्रिश्चन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जोस्लिन दिमाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अमेरिकेच्या पॉझिटिव्ह डिसिप्लीन असोसिएशनच्या सदस्या योगी पटेल, युएईच्या शैक्षणिक सल्लागार जुडिथ फिलामोर, दक्षिण कोरियातील शाळेच्या मुख्याध्यापिका किम पीटर्स, शिक्षक किम सेंगवान, ब्राझीलमधील व्हर्च्युअल एक्स्चेंज मेकरच्या संस्थापिका रोजा ड्रयुमंड यांनी संवाद साधला. आचार्य श्री विजय वल्लभ शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली तारे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक विमल परदेशी यांच्यासह अन्य शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com