श्‍याम देशपांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्‍याम देशपांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे, ता. १४ : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्‍याम देशपांडे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

श्‍याम देशपांडे हे कोथरूड भागातून दोन वेळा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या पत्नीनेदेखील दोन वेळा नगरसेविका म्हणून काम केले आहे. पुणे महापालिकेत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या ‘पुणे पॅटर्न’च्या काळात देशपांडे हे २००८-०९ यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच २०१२ ते २०१४ या कालावधीत ते शिवसेनेचे शहरप्रमुख होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याच्या निषेधार्थ पत्र लिहून त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. आजअखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षीरसागर, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे, अनिल मरळ, सुरेश कुलकर्णी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com