‘शाश्वत धोरणांची कास धरून काम करावे’

‘शाश्वत धोरणांची कास धरून काम करावे’

पुणे, ता. २० ः ‘‘सामाजिक आरोग्याच्या समस्या सोडविताना तळागाळातील नागरिकांना समान वागणूक देत त्यांना आवश्यक ती मदत करणे महत्त्वाचे आहे. हे करत असताना व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआरच्या माध्यमातून शाश्वत धोरणांची कास धरत काम करणे, ही काळाची गरज आहे’’, असे प्रतिपादन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी नुकतेच केले.
सोशिओ कॉर्प इंडिया संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या सीएसआर चित्रपट महोत्सवाच्या समारोप व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डॉ. गंगाखेडकर बोलत होते. याप्रसंगी सोशिओ कॉर्प इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. चेतन गांधी, संचालिका सरस्वती मेहता, बाळासाहेब झरेकर, सतीश कोंढाळकर, विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक विषयांवरील ५२ चित्रपटांनी सहभाग नोंदविला. यापैकी १९ चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले. फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सल्लागार डॉ. लीना बोरुडे, कार्नेलियन कॅपिटलचे संस्थापक विकास खेमाणी, केव्हीआयएक्सचे संस्थापक संचालक प्रदीप नागोरी आणि वरिष्ठ सीएसआर सल्लागार सुखदा खिस्ती यांनी परीक्षणाचे काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com