गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांना पसंती!

गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांना पसंती!

पुणे, ता. २५ : भांडवली गुंतवणुकीवर नफा मिळविण्यासाठी तसेच प्राप्तिकराची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांपर्यंत ही गुंतवणूक सोने, बांधकाम क्षेत्र, मुदत ठेव, प्लॉटची खरेदी यांच्यापुरती मर्यादित होती. त्यानंतर शेअर मार्केट, आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी) अशा डिजिटल गुंतवणुकींना देखील आता पसंती मिळत आहे. याच बरोबर गुंतवणुकीचे आणखी काही नवीन पर्याय उपलब्ध झाले असून नागरिकांचे त्याला प्राधान्य मिळत आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कराची बचत करता येते. तसेच तसेच त्यातून चांगला भांडवली परतावा मिळत असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आली.

१) आरर्इएसआय
बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेली आरईआयटी गुंतवणूक गुंतवणूकदारांचे पैसे म्युच्युअल फंडाप्रमाणे जमा करते. ही गुंतवणूक विविध प्रकारच्या स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवतात. या मालमत्ता अशा प्रकारे व्यवस्थापित केल्या जातात, ज्यामुळे भांडवल वाढीसह भाडे आणि भाडेपट्ट्यांमधून नियमित उत्पन्न मिळू शकते. आरर्इएसआय सूचीबद्ध झाल्यावर स्टॉक एक्स्चेंजमध्ये खरेदी करता येतात.

२) पर्पेच्युअल बाँड्स
याला कन्सोल बाँड किंवा प्रेप म्हणूनही ओळखले जाते, शाश्वत बाँड्स हे निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज असू शकतात. ज्यांची मॅच्युरिटी तारीख नसते. बाँडचा हा प्रकार सामान्यपणे कर्ज साधनाच्या विरोधात इक्विटी साधन असल्याचे समजले जाते. पर्पेच्युअल बाँड्ससोबत कायम राहणाऱ्या प्राथमिक ड्रॉबॅक्सपैकी एक म्हणजे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांपैकी एक आहे जे रिडीम करण्यायोग्यतेचा अभाव असते. हे बाँड्स राष्ट्रीयकृत बँकांचे देखील असतात. त्यामुळे ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

३) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
या योजनेत गुंतवणूक करून, महिला अल्पबचत योजनेच्या तुलनेत दोन वर्षांत जास्त परतावा मिळू शकतो. या योजनेसाठी ज्या महिला अर्ज करतील, त्यांना दोन लाखांच्या बचतीवर ७.५ टक्के एवढा व्याज दर मिळेल. महिला सन्मान बचत योजनेच्या अंतर्गत स्त्रिया दोन वर्षांसाठी सुमारे दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकणार आहेत. स्त्रियांसाठी निर्माण केलेली या प्रकारची ही पहिलीच योजना आहे.

४) परदेशी कंपन्यांचे म्युचअल फंड
जगभरातील अनेक कंपन्यांनी भारतात म्युचअल फंड आणले आहे. या म्युचअल फंडामार्फत परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. त्याचा परतावा किती असावा. या फंडने आत्तापर्यंत किती परतावा दिला आहे. दर्शनी किंमत किती आहे, या बाबी मात्र तपासून घेणे आवश्‍यक आहे.

५) आरएफसी खाते
आरएफसी खाते (निवासी विदेशी चलन) ही बँक खाती आहेत. जी निवासी भारतीय परदेशी चलनात ठेवू शकतात. ही खाती विशेषतः अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) उपयुक्त आहेत. जे भारतात परत येतात आणि त्यांच्या परदेशातील बँक खात्यांमधून परकीय चलन परत आणू इच्छितात. यात डॉलरमध्ये पैसे ठेवता येतात. रुपयाचे मूल्य घसरले तर यात गुंतवणूक करणाऱ्यांचा फायदा होती. हा एक प्रकारचा भांडवली नफा आहे.

कोणतीही गुंतवणूक करताना भांडवल वृद्धी करणारी गुंतवणूक तसेच कर सवलत गुंतवणूक याचा प्रामुख्याने विचार केला जातो. विविध प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे. त्यातून गुंतवणुकदारांना अनुभव येर्इल व त्यांना स्वतःला याबाबत आणखी माहिती मिळेल. त्यासाठी आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. ज्यांना या बाबी माहिती आहेत, ते गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा विचार करीत आहे.
- डॉ. दिलीप सातभार्इ, सीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com